आधी दिलेल्या उत्तरात एक छोटी चूक होती ती सुधारली आहे.

पहिल्या ३ प्रश्नांची उत्तरे दिल्यावर बकुळला खोली सापडली नव्हती, म्हणजे तीन प्रश्नातच सापडणारी सर्व उत्तरे बाद झाली. ती अशी-
ना, हो, हो - ३६

चौथा प्रश्न ४ आकड्याशी संबंधीत आहे, म्हणजे पहिल्या तीन प्रश्नांनंतर उरणाऱ्या खोली क्रमांकात ४ नसेल तर तीही बाद झाली
हो, ना, हो - १, ९ (चौथ्या प्रश्नाचे काहीही उत्तर दिले तरी खोली सापडत नाही.)

पहिल्या ३ प्रश्नांची उत्तरे दिल्यावर, राहिलेल्या पर्यायात ४ आकडा असणारी उत्तरे खालील प्रमाणे-
ना, ना, हो - २५, ४९
हो, हो, ना - २, ६, ८, १०, १२. १४, १८, २०
हो, हो, हो - ४, १६

पण त्यातील हो, हो, हो ह्या पर्यायाची उलट केली (ना, ना, ना) तर चौथ्या प्रश्नाचे काहीही उत्तर दिले तरी एकच खोली क्रमांक मिळत नाही.
ना, ना, ना, ना - २५ आणि ४९ सोडून २१ ते ३९ मधील सर्व विषम अंक.
ना, ना, ना, हो - ४१, ४३, ४५, ४७.

तसेच हो, हो, ना या पर्यायानंतर चौथ्या प्रश्नाचे उत्तर ना असेल तरीही एकच उत्तर मिळत नाही.
हो, हो, ना, ना - ४,  १४ आणि १६ सोडून १ ते २० मधील सर्व सम अंक.

म्हणजे आता एकच पर्याय राहिला-
ना, ना, हो.

आता ना, ना, हो नंतर चौथ्या प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर ४९ हे उत्तर आले असते. पण हीच उत्तरे उलट केली (हो, हो, ना, ना) तर मात्र एकच उत्तर मिळत नाही. म्हणजे चौथ्या प्रश्नाचे उत्तर ना असेच दिले असणार.

सारांश - प्रथम दिलेली उत्तरे ना, ना, हो, ना ह्यावरून खोली क्रमांक २५ आला. पण हीच उत्तरे उलट केल्यावर (हो, हो, ना, हो) बरोबर खोली क्रमांक खोली क्रमांक १४ हे बरोबर उत्तर मिळते. सौमित्र १४ क्रमांकाच्या खोलीत होता.