कोहम्,
कथा अतिशय आवडली. आणि खरे तर जास्त आवडली, ती कथाकथनाची नि लिहिण्याची शैली व एखाद्या भावनेला (येथे भीती) केंद्रस्थानी ठेवून त्याभवती एखादे आयुष्यच किंवा अख्खी व्यक्ती उभी करायचे तुमचे लेखनकौशल्य. अश्लाघ्य भाषेची चिंता नको; कथानायकाचे व्यक्तिमत्त्व व पार्श्वभूमी यांना साजेशीच झाली आहे तीही. प्रकर्षाने जाणवली ती 'आत्मकथनाची' पद्धत. तुमच्या सगळ्याच कथांचे / लेखनाचे विषय पठडीबाहेरचे असतातच; पण ही 'आत्मकथन'शैली फार आधीपासून आजपर्यंत चिरकाल लक्षात राहावी अशीच आहे. अभिनंदन.