दुसरा सीन, नायिका रुसून आपल्या माहेरी निघून गेली आहे, व नायक तिला भेटायला शहरातून थेट गाडी घेऊन आला आहे. तो गाडी घेऊन बंगल्याच्या अंगणात प्रवेश करतो, हे नायिका वरून बघते, व आवेगाने ती जिना उतरून त्याला मिठी मारायला (३०-४० चा सुमार, गुजरातमधल्या खेड्यात!) खाली उतरून येते. ती तशी धावत त्याच्याकडे जात असतांना दिग्दर्शकाला स्लो मोशनमध्ये जाण्याची दुर्बुद्धी होते. आता ही नायिका, म्हणजे एकेकाळची मॉडेल ऐश्वर्या राय, मॉडेल्स कॅटवॉकवर जसे आपले हात झुलवत चालत येतात व परत जातात, तशी हात झुलवत येते (flaining her arms, हे रास्त वर्णन)! नायिकेला कशी धाव, त्यावेली हात कसे ठेव वगैरे सांगणे तर दूरच राहिले, पण तिने तिच्या पद्धतिने जे केले, ते स्लो-मो-मध्ये दाखवून परत अधोरेखित केले गेले!

मी कालच हा चित्रपट येताजाता केबलवर नाइलाजाने थोडाबहुत बघितला. वरील 'सीन'ही बघणे झाले. विशेषतः त्यातले तिचे हात झुलवीत चालणे (फ्लेलिंग हर आर्म्ज़) बघून हसू आले. असो. एकंदर ही चर्चा मजेदारच .