उत्तर : सौमित्रचा खोली क्रमांक = १४
स्पष्टीकरण :
पहिल्या तीन प्रश्नांना चोंबड्याने दिलेल्या उत्तरांच्या खालील शक्यता होतात.
शक्यता: | रांग? | सम? | वर्ग? | निष्कर्ष |
---|---|---|---|---|
क | १ | हो | हो | ४ वा १६ |
ख | १ | हो | ना | पुष्कळ |
ग | १ | ना | हो | १ वा ९ |
घ | १ | ना | ना | पुष्कळ |
च | २ | हो | हो | ३६ |
छ | २ | हो | ना | पुष्कळ |
ज | २ | ना | हो | २५ वा ४९ |
झ | २ | ना | ना | पुष्कळ |
ह्यांतल्या निष्कर्षां मध्ये २ उत्तरे मिळायला हवीत, आणि त्यातल्या एकात ४ हा आकडा असायला हवा. त्यामुळे वरीलपैकी क आणि ज सोडून इतर शक्यता असंभवनीय होतात.
तर राहिल्या क आणि ज शक्यता. ह्या गाळणी नंतर त्याने ४ आकड्याच्या अंतर्भावाविषयी माहिती दिली आणि बकुलने निर्णय घेतला. ती माहिती खोटी निघाली व सर्व उत्तरे उलट करून पाहायला लागणार असे झाले. तर क आणि ज शक्यतांतली उत्तरे उलटवून आणि चौथ्या प्रश्नाला मिळणारी खरी उत्तरे मिळून खालील शक्यता होतात.
शक्यता: | रांग? | सम? | वर्ग? | ४? | निष्कर्ष |
---|---|---|---|---|---|
ट (क च्या उलट) | २ | ना | ना | हो | ४१, ४३, ४५, ४७ |
ठ (क च्या उलट) | २ | ना | ना | ना | २१, २३, २७, २९, ३१, ३३, ३५, ३७, ३९ |
ड (ज च्या उलट) | १ | हो | ना | हो | १४ |
ढ (ज च्या उलट) | १ | हो | ना | ना | २, ६, ८, १०, १२, १८, २० |
ह्यांत फक्त ड ही शक्यता एकमेव उत्तर देते, ते म्हणजे १४. ह्या प्रकारे सौमित्रचा खोली क्रमांक १४.
चोंबड्याने दिलेली उत्तरे = शक्यता ज => २५ वा ४९ ह्यात ४ नाही => २५. ह्याचा अर्थ आधी बकुलने २५ असा निष्कर्ष काढला होता.
इतक्या सर्वांनी अतिशय उत्साहाने ह्यात भाग घेतला ह्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आहे हे लिहायलाच हवे सर्व अचूक उत्तरदात्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भाग घेऊन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद.
(हे कोडे मी आंतरजालावर वाचलेले आहे. गोष्टीचे रूप मी दिलेले आहे.)
-मेन
(काही भाग संपादित : प्रशासक)