मेघना,
कोडं आणि गोष्ट छान. तुमचे स्पष्टीकरण अपूर्ण असे मला वाटते - १४ आणि २५ जागा बदली करू शकतात. म्हणजे पाहा
जर चोंबड्याने उत्तरे १ - हो - ना - हो अशी दिली असतील तर १४ हे "खोटे" उत्तर अन २५ हे खरे उत्तर होईल -
पण
जर चोंबड्याने २ - ना - हो - ना अशी उत्तरे दिली असतील तर २५ हे "खोटे" उत्तर ठरेल अन १४ हे खरे उत्तर होइल.
मी हे करताना एक्सेल चा तक्ता वापरला - हवा असल्यास पाठवीन.