विनयची टोपी लाल

स्पष्टीकरण :
(गृहीतक : तिघांची बौद्धिक पातळी सारखीच आहे!   )

ज्या अर्थी विजयला निश्चित सांगता येत नाही त्याअर्थी त्याला एक निळीएक लाल टोपी किंवा दोन्ही लाल दिसत आहेत. ( दोन्ही निळ्या असत्या तर आपली टोपी लाल हे तो ओळखू शकला असता.)

ज्याअर्थी विलासलाही काही निश्चित सांगता येत नाही त्याअर्थी विलासला लाल टोपी दिसत आहे. (त्याला निळी दिसत असती तर आपली टोपी लाल हे त्याला सांगता आले असते.)

दोघांचीही नकारार्थी उत्तरे ऐकून, वरीलप्रमाणे विचार करून विनयने आपली टोपी लाल हे अचूक ओळखले.