इंटरव्ह्यू ही कथा अगदी अश्शीच आहे. ती कवितेच्या रूपात वाचतांना मजा आली. कृपया हा चौर्याचा आरोप समजू नये. कविता स्वयंभूच आहे. पण कथानक तसेच असल्यामुळे कथा आठवली.

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला

जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला

तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला

आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

वा झकास. प्रेमकविता हा माझा वीक पॉईंट आहे. प्रेमकथेत ती मजा नाही.

सुरेख कवितेबद्दल धन्यवाद. एवढ्या छान कवितेवर आता बहुतेक विडंबन येईलच.

पुन्हा धन्यवाद.