प्रेम म्हणजे माझे एक डोळस आंधळेपण
इंद्रधनुष्यातही दिसे मला काळे काळे वेंधळेपण
प्रेमाला मात्र तुझ्या विविध अंग
इंद्रधनुष्यातही घातलास प्रेमाच आठवा रंग
निराशेच्या दुष्काळात आशेचा इंद्रधनुष्य तू पाही

वा वा . काय मस्त आहेत या ओळी. आठव्या रंगाची कल्पना फारच सुंदर आहे.

प्रेम एकच पण त्याच्या दोन छटा किती वेगवेगळ्या. तुम्ही त्या अगदी नीट मांडल्या.

सुंदर कविता.