-मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्यातल्या समईचा...
छान. अप्रतिम ओळी. समयीचा, समईचा या शब्दांवरील श्लेष आवडला. उत्तम.
................
१) वर दुसर्या ओळीत गाभार्यातल्याऐवजी गाभार्यात चालेल. गाभार्यातल्या समईचा...ही नऊ अक्षरे होतात.
२) आहेत तेच शब्द इकडचे तिकडे, तिकडचे इकडे केल्यास उच्चारण अधिक सोपे व पर्यायाने नादमय, गेय होईल. उदाहरणार्थ ः मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..(जणू सुवर्णाचे दान)
३) मन बसंत बहार, मधुर कोकीळ गान..ही ओळ वाचताना उत्तरार्धात (मधुर कोकीळ गान) अडखळल्यासारखे होते. मी ते असे वाचले ः कोकिळाचे मधुगान.
४) अष्टाक्षरीत केवळ आठ अक्षरे जमली की झाले, असे नसते. उच्चारणाला सुलभ जाईल, असाच शब्दक्रम आवश्यक असतो. नादमयताही पाहावी लागते.
५) काही ठिकाणी तो, ते ही अक्षरे भरीची आहेत.उदाहरणार्थ ः मन मातीचा तो गंध, मन मोत्याचा तो थेंब, सुवासिनीचं ते देणं, मन मायेची ती काठी...
६) जलामृतमध्ये ला वर अनुस्वार नको
७) चांदणं टिपूर असतं किंवा पिठूर तरी...ठिपूर शब्द चुकीचा.