विनयची टोपी लाल रंगाची होती.
विलास आणि विनयच्या टोप्यांबद्दल एकूण चार शक्यता आहेत. निळी-निळी, निळी-लाल, लाल-निळी, लाल-लाल.
यातील पहिली शक्यता असती, तर विजयला त्याची टोपी लाल रंगाची आहे (दोन्ही निळ्या टोप्या समोर दिसताहेत) हे कळले असते. पण ते झाले नाही, म्हणून ती शक्यता बाद.
यातील दुसरी शक्यता असती, तर विलासला त्याच्या डोक्यावर लाल टोपी आहे हे कळले असते. ज्या अर्थी विजयला स्वतःची टोपी ओळखता आली नाही, त्या अर्थी निळी-निळी ही शक्यता नाही. आणि तरीही विनयच्या डोक्यावर जर निळी टोपी असेल, तर विलासच्या डोक्यावर लाल टोपी असायला हवी. पण तेही झाले नाही.
म्हणजे तिसरी किंवा चौथी शक्यता. त्या दोहोंत विनयची टोपी लाल आहे.