आणखी लिहिण्यासारखे बरेच काही असले तरी माझी प्रतिभा येथेच खुंटली. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर तमाम जनतेचे चेहरे सुतकी दिसत होते. तेव्हा मंडळी, माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आपला कष्टाचा पैसा आणि बहुमोल वेळ या चित्रपटाकरता खर्च करण्याआधी या लेखाचा जरुर विचार करावा!
अहो ते असे सिनेमे काढतात म्हणून तर आम्हाला असे खुसखुशीत रिव्ह्यू वाचायला मिळतात
'विमनस्क मनस्थितीत' लिहिल्याने विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे. सांभाळून घ्या...
घेतो घेतो ! लेख विस्कळीत वाटत नाही. जसे मनात वाटले तसे तुम्ही प्रामणिक्पणे लिहिले ते आवडले.
अशीच मधून मधून 'परीक्षणे लिहीत जा.