प्रा(जु)जू ,
१) मार्गदर्शन म्हणू नका, कृपया...
२) त्या त्या क्षेत्रात कसलेले, मुरलेले लोकच मार्गदर्शन करू शकतात/शकतील.
३) तुमच्या आंबेमोहोर तांदळाच्या केशरभातात मला थोडीशी कचकच लागली (कदाचित इतरांना ती लागणारही नाही ) आणि अगदीच राहवले नाही म्हणून लगेचच सांगून टाकले, इतकेच.
४) मी हे सारे सांगितले ते कवितेचा सच्चा प्रेमी, सच्चा वाचक या नात्याने. त्यात अन्य कोणताही पवित्रा अथवा भूमिका नव्हती.
५) तुम्ही दिलेल्या धन्यवाद या प्रतिसादात मला लिहिताना सुरवातीलाच पण हा शब्द आहे; त्या शब्दाचे प्रयोजन समजले नाही. बहुधा पण च्या आधीचे आ हे अक्षर उडाले असावे.
धन्यवाद.