या जगात प्रत्येक अनुभव मोलाचा असतो. तसेच प्रत्येक अनुभव स्वतःच घेतला पाहिजे असे नाही. परिचित व आप्तांचे अनुभव, प्रगाढ वाचन व प्रत्येक गोष्टीची डोळसपणे केलेली मीमांसा यातून कितीतरी ज्ञान मिळते. दुसऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः विज्ञाननिष्ठ राहून मिळवलेले शहाणपण जास्त मोलाचे!