मेघनाताई,

आपण सांगितलेले उत्तर बरोबर आहे यात शंका नाही. फक्त ते एकमेव उत्तर नव्हे, येवढेच माझे म्हणणे.

"अमूक एका क्रमाने घटना घडत गेल्या आणि मध्ये मध्ये निर्णय होत गेले. तर ते नेमके कसे होत गेले असतील ते शोधायचे आहे." हे आपले म्हणणे तंतोतंत पटले. म्हणून आता एक घटनाक्रम पाहू :

सुरवातीला बकुलला खोली क्र. १ ते ५० अश्या ५० पर्यायांमधून निवड करायची होती. म्हणून तिने विचारले, "क्रमांक एकच्या रांगेत त्याची खोली आहे का?" चोंबडा म्हणाला "हो". आता पर्याय राहीले १ ते २०. मग तिने विचारले "खोलीचा क्रमांक सम आहे का?", चोंबडा म्हणाला "हो". त्यामुळे आता पर्याय उरले {२, ४, ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०}. मग तिने विचारले, "खोलीचा क्रमांक पूर्ण वर्ग आहे का?", चोंबडा म्हणाला "नाही". त्यामुळे आता पर्याय उरले {२, ६, ८, १०, १२, १४, १८, २०}.  मग तिने विचारले, "खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?" तर चोंबडा म्हणाला "हो". झाले, तिने खोली क्र. १४ चे बटण दाबले खरे, पण चोंबडा खोटे बोलला होता. त्यामुळे त्याची सगळी उत्तरे विरुद्ध करणे भाग पडले.

आता नवीन उत्तरे झाली ना, ना, हो, ना. आता "क्रमांक एकच्या रांगेत त्याची खोली आहे का?" चे उत्तर "नाही", म्हणून पर्याय उरले २१ ते ५०. "खोलीचा क्रमांक सम आहे का?" चे उत्तर "नाही", म्हणून पर्याय उरले {२१, २३, २७, २५, २९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ४१, ४३, ४५, ४७, ४९}. "खोलीचा क्रमांक पूर्ण वर्ग आहे का?" चे उत्तर "हो", म्हणून पर्याय उरले {२५, ४९} आणि "खोलीच्या क्रमांकात ४ हा आकडा आहे का?" चे उत्तर "नाही", म्हणून खोली क्रमांक झाला २५.

म्हणून २५ हे उत्तर ही बरोबर आहे.

आपला,

रसग्राहक