विनय(अ म्हणूया) , विलास(ब म्हणूया), विजय(क म्हणूया) हे एकापाठीमागे एक उभे आहेत. जर अ, ब दोघांवर निळ्या टोप्या असत्या तर निळ्या टोप्या दोनच असल्यामुळे माझ्यावर लाल टोपी आहे असे क ठामपणे सांगू शकला असता. पण क "सांगता येत नाही" म्हणाला याचा अर्थ अ, ब वर "लाल, लाल" किंवा "लाल, निळा" किंवा "निळा लाल" या आणि फक्त याच टोपीशक्यता आहेत. आणि हा निष्कर्ष अ आणि ब सुद्धा काढतील. आणि म्हणून जर अ वर निळी टोपी असती तर माझ्यावर लाल टोपी आहे असे ब ठामपणे सांगू शकला असता. पण ब "सांगता येत नाही" म्हणाला याचा अर्थ अ वर लाल टोपी असली पाहीजे. हाच निष्कर्ष अ ने - म्हणजे विनयने - काढला आणि स्वतःच्या डोक्यावर लाल टोपी असल्याचे सांगितले.

रसग्राहक