छट-धंदे म्हणजे छट-पूजेच्या नावाखाली बिहारी नेत्यांना महाराष्ट्रात बोलावायचे आणि महाराष्ट्र कसा गिळंकृत करता येईल याचे बेत बिहारी जनतेला समजावून सांगायचे.
मराठी रंगपंचमी गेली आणि होली आणि त्यानिमित्त भांग पिणे बोकांडी बसले. तसेच नारळी पोर्णिमेऐवजी राखी पोर्णिमा, दसऱ्याच्या सीमोल्लंघन करून सोने लुटायच्या ऐवजी रावण-दहन, वटपोर्णिमेऐवजी कडवा चौथ, कुंकवाऐवजी भांगेत शेंदूर आणि शिवाजीमहाराजांचा विजय ऐवजी छशि महाराजाकी जय! श्रीयुत राजमान्य राजेश्री वगैरे गेले आणि आले मा. ना.अमुकरावजी तमुकसाहेब, आणि यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक!!