माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मराठीत केले तर तसे शिक्षण घेणारी मुले जगात सर्वात नालायक ठरतील. लक्षात असू द्या, जगातल्या कुठल्याही देशात विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळत नाही. शिक्षणाची भाषा ही जगन्मान्य तंत्रभाषाच असायला पाहिजे.
याउलट, मराठी मुलांना शालेय शिक्षणात कमीतकमी पाच भाषा शिकवा, पाश्चात्य देशात जसे एकापेक्षा अधिक भाषा शिकवतात तशा! गणित-शास्त्र-भाषा शिकवायला लायक शिक्षक निवडा. भरतीचे अधिकार लाचखाऊ नगरसेवकांकडून काढून घेऊन एखाद्या स्वायत्त संस्थेकडे द्या. संस्कृतसारखा शिक्षक न मिळणारा विषय शिकवायला दुप्पट पगार द्या. उर्दू शाळा बंद करून सामान्य शाळांतून हवे त्याला उर्दू शिकू द्या.
बघा मराठीची प्रगती होते का नाही. परप्रांतीयांना मराठी शिकवून आपल्याच पायावर धोडा पाडून घेऊ नका.