तुमच्या सारखाच माझाही मोरू झाला होता एकदा. मी शाळेत असताना.. म्हणजे ९-१० वीत असताना आम्ही नुकतेच कोल्हापूरला रहायला आलो होतो.... माझ्या बाबांची एक लांबची बहिण आमच्या घराजवळच राहत होती. तिला मी १-२ भेटले होते. एकदा सायकलवरून एकदा कुठेशी निघाले होते. मला एक बाई माझ्या पुढे चालत निघालेली दिसली. पाठीमागून ती मला माझी 'ती' आत्याच वाटली. मी तिच्या जवळून जाताना, " आता दुपारची कुठे निघालीस गं?? " असं अगदी ठसक्यात विचारलं.. तिने वळून पाहिलं... आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी बघण्यालायक होते. एकतर ती असा विचार करत असेल की, ही कोण भवानी मला विचारणारी?" किंवा, "काय वेडी बिडी आहे की काय ही मुलगी??"... मी मात्र तिचा चेहऱा दिसल्या दिसल्या मान एकदम वळवली आणि जोरात सायकल हाणत निघून गेले आणि मैत्रिणीकडे जाऊन खो खो हसू लागले...
- प्राजु