प्रिती (प्रीति?)

महात्मा फुल्यांचं बोली भाषेतलं साहित्य तुपात घोळवून, बामणी मराठीत पुन्हा लिहून काढावं, किंवा 'फुल्यांनी मुळात बोली भाषेत लिहिलंच का?' असं कोणाचंही म्हणणं दिसत नाही.

जर काही मजकूर पूर्ण बोली अथवा ग्रामीण भाषेत लिहिला असला, तरी बहुसंख्य वाचकांना तो वाचायला आणि समजायला त्रास होणार नाही. मी 'उपरा', 'बलुतं' इत्यादि एका बैठकीत वाचून काढलेली आहेत.

जेंव्हा भाषेत एकसंधता नसते तेंव्हा वाचायला त्रास होतो, इतकंच.

उदाहर्णार्थ, तुझं वरील लिखाण पूर्णपणे सुसंबद्ध आणि व्याकरणाच्या सर्व नियमांना धरुन आहे, तसंच विचारही बुद्धिवादी आहेत. त्यांत 'ब्राम्हणी', 'पुरोगामी', 'संस्कृति', 'नियमावली' असे शब्दही आहेत. अशात मध्येच 'कुनीतरी' असं वाचल्यावर खटकतं, इतकंच.

तसं मी वरण भातावर तूपाची धार असल्याशिवाय जेवत नाही, आणि मटणाबरोबर भाकरी आणि कच्चा कांदा नसला तर मला खपत नाही.