म्हणजे काय प्रकरण आहे ते समजले नाही? त्याचे रोजच्या भाषेतले नाव (इंग्लिशमधले) सांगितलेत तर जरा संदर्भ लागेल.
जाळ्यावरील अनेक प्रकारची माहिती मराठीत आणण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
परंतु भाषांतर करताना जर नवीन शब्दांची भर घालीत असाल तर मूळचा अ-मराठी शब्द संदर्भासाठीतरी द्यावा.
भाषेचा मूळ हेतू संदेशवहन हा आहे हे कायम ध्यानात ठेवून नवीन शब्द तयार करताना भाषा दुर्बोध होणार नाही याची काळजी घ्यावी.