२५ हे उत्तर बरोबर असेल तर पहिल्या ३ प्रश्नांची खरी उत्तरे हो, नाही, हो अशी असतील.
म्हणजे
चोंबड्याची उत्तरे नाही, हो, नाही अशी असतील. यावरून बकुलला असे वाटेल की
उत्तर {२२, २४, २६, २८, ३०, ३२, ३४, ३८, ४०, ४२, ४४, ४६, ४८,
५०} यापैकी एक आहे.
आता त्या चौथ्या प्रश्नाला विशेष अर्थ राहात नाही कारण त्याचे उत्तर काहीही आले तरी बकुलला एकच उत्तर शिल्लक ठेवता येणार नाही.
म्हणून पहिल्या ३ प्रश्नांची उत्तरे अशी असायला हवीत की त्यातून २ शक्यता राहतील ज्यातल्या एकात ४ अंक असेल
तरीही ४थ्या प्रश्नाचे खरे उत्तर नाही असे आहे - पण चोंबडा ते "हो" असे देईल.
म्हणजे बकुल कडे {२४, ३४, ४०, ४२, ४४, ४६, ४८} इतके पर्याय राहतील.
पण
जेव्हा तो खोटारडा आहे असे तिला कळेल तेव्हा तिला हे समजेल की खरी उत्तरे
हो, नाही, हो अशी आहेत. म्हणजे दोन पर्याय शिल्लक राहतात - ९ / २५ - एकच नाही.
म्हणजेच ताळा जमत नाही - असेच १४ सोडून इतर ४८ संख्यांच्याबाबत दाखविता येईल.