आपण पाहिलेला गोजिरी हा '५० फर्स्ट डेटस्' या इंग्रजी चित्रपटासारखाच वाटतो.
त्यातही तिचे स्मरणशक्ती फक्त एका दिवसाची असते. ति सुद्धा तिच्या वडिलांचा वाढदिवस रोज साजरा करते. एक दिवस तिचा मित्र आणि वडील तिला तिच्या या रोगाची (?) जाणीव देतात आणि एका रुग्णालयात/आश्रमात घेऊन जातात. तिथे तर तिला एक असा व्यक्ती भेटतो ज्याची स्मरणशक्ती केवळ २-३ मिनिटाची असते!!
अधिक माहितीसाठी हा दुवा बघा:
कशी असतील आश्या लोकांची आयुष्ये?...... स्वतःच्याच विश्वात गटांगळ्या खात राहिलेली.... ना ही कुठला भुतकाळ.... ना काही भविष्य.
खरंच, या विचाराने मन सुन्न होता. रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला कालचे काहीच आठवत नाही याची कल्पनाच करवत नाही.