उत्तम कल्पना आहे. या क्लासचा (वर्गाचा?) शुभारंभ खालील विद्यार्थ्यांनी करावा असे सुचवावेसे वाटते.
१. मुकेश अंबानी
२. अनिलभैय्या आणि टिनावहीनी (आमच्या मामाच्या कलासला यायचं हं!)
३. रतन टाटा
४. परमेश्वर गोदरेज
५. शाहरुख खान (ओम शांती ओम साठीचा माफक सूड!)
६. सलमान खान ('रामा इकडे ये' गिरवायला लागला तर टिनपाट चित्रपट तरी कमी होतील)
७. मराठी वाहिन्यांवरील सर्व निवेदक आणि निवेदिका. दे नीड इट द मोस्ट, यू नो!
८. रा. रा. दाउदभाय : आता (बहुधा) दुबईत असले म्हणून काय झाले, शेवटी ते मुंबईचेच ना! 
९. आता दाउदभाय आहेत म्हटल्यावर पक्या डेंजर, कल्लू टेंशन इ. येणारच ना!
१०. दिवसभर मरेस्तोवर काम करून दोन वेळचे जेवण मिळवणारे हमाल, फेरीवाले वगैरे.
हॅम्लेट