विनयच्या डोक्यावर लाल टोपी होती.
जर विनय आणि विलासच्या डोक्यावर निळ्या टोप्या असत्या तर विजयला नक्की कळल असत की त्याच्या डोक्यावर लाल टोपी आहे. ह्याचा अर्थ विनय आणि विलासच्या डोक्यांवर दोन्ही लाल किंवा एक लाल व एक निळी टोपी असणार हे सगळ्याना कळून चुकल.
आता विनयच्या डोक्यावर जर निळी टोपी असती तर विलासला नक्की कळल असत की त्याच्या डोक्यावर लाल टोपी आहे. विलासला सांगता येत नाही ह्यावरून विनयच्या डोक्यावर नक्कीच लाल टोपी असली पाहीजे.