अभिनंदन! तुम्ही अगदी महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे.

पण मला वाटते की सरकारने (न)केलेल्या मूलभूत (सोई)समस्यांपेक्षा सामान्यांनी काहीएक शिस्त पाळणे आवश्यक आहे. 

आपण रस्ता इंच इंच लढ्वल्याशिवाय ईप्सित स्थळी पोहचूच शकणार नाही अशा सिद्धांतावर ज्यांचा गाढ विश्वास आहे अशा सर्व दुचाकी आणि त्रिचाकी ( आणि अन्य ही, ४ चाकीवालेसुद्धा)स्वारांना जोपर्यंत आपण आवरू शकत नाही तोपर्यंत वाहतूक ही अशीच चालू राहणार आहे , अगदी लंडन/ टोकीयोचे  रस्ते आयात केले तरीही!

एकूणच आमच्या सार्वजनिक जीवनात 'कायदे हे तोडण्यास असतात' यावर आमचा गाढ विश्वास आहे! सरकार / पोलीस काय करतील हो? माणशी एक पोलीस नेमणे शक्य नाही, ( आणि नेमले तर दोघे मिळून 'सेटींग' करणार नाहीत कशावरून? )

आम्हाला आमचे स्वातंत्र्यच मूळात 'कायदेभंग'( भले सविनय असेल ) करूनच मिळाले. आमचे सरकार बदलले, 'त्यांचे'जाऊन 'आमचे' आले , तरी कायदेभंग चालू आहे......( आणि असेच चालू राहीले तर पुन्हा 'त्यांचे' आल्याशिवाय राहणार नाही!)

तेव्हा तूर्तास- आपले रक्त न तापवता...

१." मी स्वतः वाहतूकीचे नियम तोडणार नाही" अशी प्रतिज्ञा करा. सार्वजनिक / अन्य वाहनातून जाताना आपल्या चालकाने तसे केल्यास तीव्र आक्शेप घ्या. ( आक्षेप घेतल्यास इतरांचा पाठींबा मिळतो असा स्वानुभव आहे)

२. आपल्या मुलांना नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षण द्या.

३. आपण वाहतूकीचे नियम पाळतो याचा अभिमान बाळगा.

४. शक्य तर सार्वजनिक वाहनांतूनच प्रवास करा. (पुणेकरांसाठी--पी. एम, टी. वाटते तितकी वाईट नाही.) स्वतः ची ४ चाकी असणे ही आता फ़ार अभिमानाची बाब राहीली नाही. लांबलचक कार घेऊन तुळशीबागेत केल्यास कोणीही "हेवा" करीत नाही/ नपेक्षा शिव्यांचा "मेवा" मात्र मिळतो.

५. तसेच मी स्वतः रस्ता ओलांडताना वेंधळ्यासारखा मध्येच घुसणार नाही. जिथे शक्य असेल तिथे 'झेब्रा' पट्ट्याचा वापर करीन असे ठरवा.

६. मी कर भरतो आणि म्हणून रस्ता माझ्या बापाचा आहे ही भूमिका सोडून ,मी इतरांना रस्ता देण्याचा प्रयत्न करीन असे ठरवा. ( विश्वास ठेवा, ९०% लोक तुमच्या सारखाच विचार करतात, गरज आहे ती लीड घेण्याची!)

बाकी सरकार जे करेल ते करेल. अहो, आम्ही जसे आहोत तसे आमचे सरकार आहे! यथा राजा तथा प्रजा. शेवटी सरकार म्हणजे तरी कोण हो ?? आमच्यापैकीच कुणीतरी नाही का?

कोणीतरी कुठेतरी सुरवात तर करायला हवी? Charity Begins at Home!  असे मी माझ्यापुरत् ठरवले आहे.