आपले म्हणणे खरे आहे, विटेकर. प्रत्येकानेच आपापल्या परिने नियम पाळलेच पाहीजेत. पण काळे पांढरे पट्टे मात्र सरकारनेच मारले पाहीजेत हे ही खरे आहे.
पण कमीत कमी, आवश्यक त्या ठीकाणी झेब्रा क्रॉसींग चे काळे पांढरे पट्टे मारण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवली (फक्त एकदाच नाही तर ते खराब झाल्यावर पुन्हा पुन्हा) तरी फार बरे वाटेल. कारण ते पट्टे नसतीलच तर मग रस्ता ओलांडायचा तरी केव्हा आणि कसा? कारण वाहने तर सतत चालूच असणार आणि सिग्नल नसल्याने ते कधीच थांबणारच नाहीत. आणि मग दोष पादचाऱ्याचाच धरला जाणार कारण झेब्रा क्रॉसींग नसताना तो रस्ता पार करत होता.