जीवनात निसर्ग इतका प्रेमळ गुरू शोधून हि सापडणार नाही,आणि गुरू चांगला सापडून उपयोग नाही कारण शिष्याला त्याची प्रगती स्व:तहा करावी लागते.वर दिलेले जितक्या शिष्यांचे नावे दिलेली आहेत ती सुधा सामान्य माणसेच होती, पण असामान्य होती त्यांची जिज्ञासा, त्यांचा विश्वास, निसर्गाने बरेच गुपित आपल्या समोर मांडले आहेत पण आपलीच निरीक्षण क्षमता नाही.उदा. जंगलात पाऊस यायचा असेल तर सर्वात आधी मुंग्यांना माहीत होते. त्या सर्व घरा कडे परततात.आपल्या पेक्षा प्राण्यांची संवेदन क्षमता जास्त आहे, म्हणून धोक्याची सूचना आपल्या पेक्षा त्यांना लवकर कळते.म्हणून म्हणतो कोणत्या ही गुरुच्या नांदी न लागता निसर्गाला गुरू करावा असे मत आहे.