पुलस्ती,

सर्वच शेर (?) चांगले आहेत. कल्पना चांगल्या आहेत.

हसावे वाटते, लपावे वाटते...असे ज्या वेळी आपण म्हणतो, त्या वेळी हसावेसे, लपावेसे असे आपल्याला म्हणायचे असते. आता तुमच्या प्रत्येक शेरा (?)तील अन्त्ययमकाला मी (मनातल्या मनात) से लावले आणि ही गझल वाचली. कवितेविषयीच्या  शेरा(?) त  - का नवी कविता लिहावीशी वाटते,- असे मी वाचले.

तुमच्या या रचनेतील पुढील कल्पना मला फार म्हणजे फारच आवडल्या...

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

तोच मी अन् त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?


जाणतो होणार नाही जे कधी
ते अचानक आज व्हावे वाटते...

हे असावे ते नसावे वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?

(ही कल्पना मला आवडली; पण ती अधिक सुस्पष्टपणे यायला हवी होती.)


पुढील गझलेसाठी अनेकानेक शुभेच्छा.