झेब्रा क्रॉसींग चे काळे पांढरे पट्टे मारूनही जास्त फायदा होत नाही असे माझे निरीक्षण आहे.
एक तर पादचारी आपल्या मनात येईल तिथून रस्ता ओलांडत असतात. आणि झेब्रा क्रॉसींगवरच गाड्या उभ्या असतात लाल दिवा असताना.
ठाण्यात तर प्रत्येक ठिकाणी फलक लावले होते की झेब्रा क्रॉसींग वर गाडी थांबविल्यास दंडात्मक कारवाई होईल. पण ह्याचा जास्त फायदा झालेला दिसला नाही.
तसेच ह्याबाबत मी पुण्यात असताना एका वाहतूक पोलिसाला विचारले होते की झेब्रा क्रॉसींगवर गाडी उभी केलेली चालते का? तर  तो म्हणाला की "काय करणार? एखाद्याला हटकले तर तो म्हणतो मी कोण आहे माहित आहे का?" वगैरे वगैरे.