१. चाळीस लिटरच्या बरणीतून आधी पाच लिटर दूध काढायचे. त्या बरणीत राहिल ३५ लिटर दूध.
२. त्या पाच लिटरमधून चार लिटरची बरणी भरून घेतली की, पाच लिटरच्या बरणीत एक लिटर दूध शिल्लक राहील.
३. चार लिटरच्या बरणीतील सारे दूध आधीच्या ३५ लिटर दूध शिल्लक असलेल्या बरणीत ओतायचे. त्या बरणीत आता ३९ लिटर दूध राहील.
४. पाच लिटरच्या बरणीतील एक लिटर दूध चार लिटरच्या बरणीत टाकायचे.
५. ३९ लिटरमधून पुन्हा पाच लिटर दूध काढायचे. त्या बरणीत शिल्लक राहिल ३४ लिटर दूध.
६. त्या पाच लिटरमधून चार लिटरची बरणी पूर्ण भरली की, पाच लिटरच्या बरणीत दोन लिटर दूध शिल्लक राहील (कारण चार लिटरच्या बरणीत आधीच एक लिटर दूध आहे) - कोड्याची एक अट पूर्ण.
७. चार लिटरच्या बरणीतील सारे दूध पहिल्या मोठ्या बरणीत पूर्ण ओतले की त्या बरणीत शिल्लक राहील ३८ लिटर दूध.
८. दुसऱ्या चाळीस लिटरच्या बरणीतून चार लिटरची बरणी भरून घ्यायची. मोठ्या बरणीत शिल्लक राहील ३६ लिटर दूध - कोड्याची दुसरी अट पूर्ण.
९. चार लिटरच्या बरणीतून आधीच्या अडतीस लिटरच्या बरणीत दोन लिटर दूध टाकले ती बरणी पूर्ण चाळीस लिटरने भरेल - कोड्याची तिसरी अट पूर्ण. आणि चार लिटरच्या बरणीत दोनच लिटर दूध राहील - कोड्याची चौथी अट पूर्ण.
या कोड्यात किती पायऱ्या हव्या आहेत? मी नऊ पायऱ्यांमध्ये सोडवले. त्यापेक्षा कमी शक्य आहे का?