२आधी ४ लिटर च्या बरणीत काठोकाठ दूध घ्यायचे. ते ५ लिटरच्या बरणीत रिकामे करायचे.
परत ४ लिटरच्या बरणीत काठोकाठ दूध घ्यायचे. आता ५ लिटरच्या बरणीत, ती काठोकाठ भरेपर्यंत, ४ लिटरच्या बरणीतून दूध ओतायचे. असे केल्यावर ४ लिटरच्या बरणीत ३ लिटर दूध शिल्लक राहील.
५ लिटरच्या बरणीतले दूध परत ४० लिटरच्या बरणीत रिकामे करायचे.
आता ४ लिटरच्या बरणीतील दूध ५ लिटरच्या बरणीत रिकामे करायचे.
परत ४ लिटरच्या बरणीत काठोकाठ दूध घ्यायचे. आता ५ लिटरच्या बरणीत, ती काठोकाठ भरेपर्यंत, ४ लिटरच्या बरणीतून दूध ओतायचे. असे केल्यावर ४ लिटरच्या बरणीत २ लिटर दूध शिल्लक राहील.
५ लिटरच्या बरणीतले दूध परत ४० लिटरच्या बरणीत रिकामे करायचे.
आता ४ लिटरच्या बरणीतील दूध ५ लिटरच्या बरणीत रिकामे करायचे.
असे केल्यावर ४ लिटरची बरणी रिकामी असेल.
५ लिटरच्या बरणीत २ लिटर दूध असेल.
अन् ४० लिटरच्या २ बरण्यांपैकी १ पुर्ण भरलेली असेल अन् दुसरीत ३८ लिटर दूध असेल.
आता परत ४ लिटरच्या बरणीत पुर्ण भरलेल्या ४० लिटरच्या बरणीतून काठोकाठ दूध घ्यायचे. अन् त्यातले दूध ३८ लिटर दूध असलेल्य बरणीत ती पुर्ण भरेतोवर रिकामे करायचे.
असे केल्यावर ४ लिटरच्या बरणीत २ लिटर दूध असेल. ५ लिटरच्या बरणीत २ लिटर दूध असेल.
अन् ४० लिटरच्या २ बरण्यांपैकी १ पुर्ण भरलेली असेल अन् दुसरीत ३६ लिटर दूध असेल.
- राहुल.