प्रथम 'हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही' ही जमीन दिल्या बद्दल मिलिंद फणसे यांचे मनापासून आभार.
महेश,
प्रतिसाद आणि सूचनांबद्दल मनापासून धन्यवाद.
आपण सुचवलेला बदल उत्तम आहे, मला सध्याचे सरकार असे काहीसे म्हणायचे होते म्हणून 'हे' चा वापर केला.
चक्रपाणी / प्रदिप / पुलस्ति,
'येत' ही चूक माझ्या ही लक्षात आली होती, पण जे सुचले होते, ज्या कल्पना मनात होत्या त्यात इतर रदिफ बेत, प्रेत, घेत, देत, वेत ,सभेत, हवेत, कवेत..इ.. चपखल बसत नव्हते , थोडा प्रयत्न केला असता तर जमले ही असते, पण आभिप्रेत असलेला अर्थ आला नसता असे वाटले.
एक रदिफ दोन वेळा वापरल्याची बरीच उदाहरणे वाचनात आली आणि काही तज्ञांशी झालेल्या चर्चे मध्ये रदिफ दोनदाच वापरावा असा संकेत आहे नियम नाही असा काहीसा प्रतिवाद ही ऐकला .. लिहिलेले खारिज करायला मन धजवले नाही.. म्हणून शेवटी कविता म्हणून प्रकाशीत केली इतकेच
असो..
मुळात सुचतानाच गझलेच्या आकृतीबंधात / नियमात सुचण्याची/ विचार करण्याची सवय स्वतःला लावावी लागेल म्हणजे अशी द्विधा मनस्थीती भविष्यात येणार नाही.प्रतिसाद आणि सूचनांबद्दल मनापासून धन्यवाद.
पुन्हा एकदा प्रतिसादा बद्दल सर्वांचे मनापासून आभार.
अनिरुद्ध.