गालगागा गागागा लगागागा गलागा...असल्या कुठल्याच भानगडीत पडत नाही..... ...उदाहरणार्थ ः राधिका राधिका यमाचा गा... अशी असंख्य .....

राधिका राधिका यमाचा गा हे अक्षरगणवृत्तासाठी योग्य आहे; पण मात्रागणवृत्तासाठी, जिथे एका गुर्वक्षराची दोन लघ्वक्षरे होण्यास मुभा असते, असे 'गण' कसे पाडता येतील? मात्रांची संख्या आणि लघ्वक्षरांचे अढळपद सांभाळले की झाले, अशी माझी समजूत आहे.

हे मी तुम्हाला आव्हान देण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी लिहीत नसून माहिती घेण्यासाठी लिहीत आहे.