इंग्रजांच्या काळात भारताची भाषा एकच होती, त्यामुळे भांडणे नव्हती. आता दोन आहेत,  हिंदी आणि इंग्रजी. त्यामुळे इतर प्रान्तीयांशी बोलायची भाषा यातली एक, आणि लेखी संपर्कासाठी इंग्रजी.  भांडणाला कुठेच वाव नाही.  आमचीच भाषा श्रेष्ठ म्हटल्याने भांडणे होतात. म्हणूनच घटनेमध्ये हिंदीला राष्ट्रभाषा केलेले नाही.  हिन्दीला संपर्कभाषा करण्याचा प्रयत्न करावा अशी फक्त शिफारस आहे. तशी हिन्दी सध्या आहेच.