टाकून जुन्याला द्यावे
तर अशक्य होते जगणे
अन् कवटाळावे त्याला
तर एकाकी धगधगणे
हा आयुष्याचा गुंता
सोडविल्याने सुटतो का?
अन् पीळ आतला कधिही
जाळला तरी तुटतो का?
दोन्ही कडवी सुंदर...
आवडली कविता, चैतन्य.
लयीत आणि छंदात तू याहीपेक्षा आणखी चांगले लिहू शकशील.
नजारे शब्द खटकला. शुभेच्छा.