हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?
प्रीत माझी मोहरे गाली तुझ्या
मागशी तरिही पुरावे...का असे?
रोख भरले श्वास मी रोज तरिही
व्याजही थोडे उरावे...का असे?
छान.
काय मी नसणार उद्याला?उगा या ओळीत गडबड वाटते. उद्द्या होत नाही तर उद्या होते. त्यामुळे मात्रा गडबडल्या, असे वाटते. चूभूद्याघ्या.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.