वा गुरुजी,
एकदम झकास विडंबन.. खालील द्विपदी विशेष आवडल्या..

मीही लिहीन म्हणतो कविता जुन्या नव्याने
संदर्भ चोरलेले कळतील पण अशाने

उकरून काढले मी इतिहास, वाद सारे
झाले जिवंत सारे कंपू पुन्हा नव्याने

काव्यास आज माझ्या का ती बघून हसते
जुंपेल खास अमुची केव्हा तरी अशाने

ढापू कुणाकुणाच्या ओळी मला कळेना
चाळून पाहिल्या मी कविता क्रमाक्रमाने

केशवसुमार