कोणत्याही क्षेत्रातील तंत्रज्ञाची हीच परिस्थिती आहे. म्हणजे यंत्र अभियांत्रिकी , औषधवैद्यकीय   वैद्यकीय या सर्व क्षेत्रात माझे पुढील पिढीतील जे तरुण नातेवाइक आहेत ते सर्व जाण्याची वेळ निश्चित पण परतण्याची नाही या प्रकारात मोडतात आणि पुष्कराजांसारखे ठरवून वेळेवर घरी येता येण्याइतके ते भाग्यवानही नाहीत भारतात असल्यामुळे त्यांना शनिवारही नाही.  ते काही शनिवारी आणि इतर दिवशी सूर्यास्तानंतर काम करण्यात भूषण मानत नाहीत पण अशी परिस्थिती आहे आणि त्यावर उपाय नाही.