एखाद्याने समजा खालील प्रश्न विचारले तर त्याला कसे उत्तर द्यावे?

प्रश्न : आनंदकंद वृत्ताचे गण कोणते? किंवा आनंदकंद वृत्ताच्या मात्रा कोणत्या? किंवा आनंदकंद वृत्त कसे ओळखावे?

सोबत उदहरणादाखल एक दोन उदाहरणेही द्यावीत.

टीप : हे मी आनंदकंद वृत्ताची माहिती घेण्यासाठी विचारत नसून त्याचे उत्तर तुम्ही ज्या पद्धतीने द्याल त्यावरून मला माझ्या पुढच्या म्हणण्याची मांडणी करता येईल आणि चर्चा भरकटणार नाही, ह्या उद्देशाने विचारत आहे.

लघ्वक्षरांचे अढळपद सांभाळले की झाले,

मात्रागणवृत्तात एका गुर्वक्षराची दोन लघ्वक्षरे झालेली चालतात. पण .... लघ्वक्षरे जागा सोडत नाहीत. असे माझे निरीक्षण आहे. म्हणजे गागागा चे ललगागा होईल पण लगागागा केल्यास मात्रा तितक्याच राहूनही वृत्त बिघडेल. (लघ्वक्षर अढळ राहते)

कदाचित एखादे उदाहरण घेऊन मुद्दाम वृत्त बिघडवून अधिक स्पष्ट करावे लागेल. ते जमले की पुन्हा लिहीन.