छाया,

तुझ्या प्रतिसादातून मला एकदम पटलं, की हे संदिग्ध वाटतंय खरं! तर पुन्हा एक प्रयत्नः

बायको काम करत असतांना, सोफ्यावर पाय पसरून

तिच्या चुका काढणे, ही तुझ्या विनोदाची व्याख्या बदल आता-

अडनिड्या वयात नाही का मुलं, स्वतःचं अज्ञान झाकत,

मोठ्यांची वाक्य फेकतात- तसं

तुझ्या अशा "खेळकरपणाचं" आई बाबांनी केलं असेल कौतुक,

पण आता तू खरंच मोठा झाला असशील,

तर अशा अगोचरपणाची गरज नसावी तुला!

पण नसशील, तर अजूनही, मोठा हो.