कवितेच्या विषयाला आणि शीर्षकाला साजेसे असले तरी कवितेतून प्रकटलेले एकांगी विचार खटकले. चार घटका करमणूक करून घेऊन वाचून सोडून द्यायचे ठरवले. पण तरीही सद्यस्थिती यापेक्षा बरीच वेगळीही असल्याची जाणीव का होऊ नये, याचे आश्चर्य वाटल्याविना राहिले नाही.

बायको काम करत असतांना, सोफ्यावर पाय ताणून
तिच्या चुका काढणे
म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
आई-बाबांनी केलं असेल कौतुक त्याचं लहानपणी,
पण आता- मोठा हो.

हे असे मी लहानपणी केले असल्याचे आता तरी आठवत नाही; पण केले असते/ले तर कशाकशा पद्धतीने आणि कशाकशाने सोलून निघालोय, हे येथे सांगता यायचे नाही  त्यावेळी आणि/किंवा अशा काही 'क्रिटिकल' प्रसंगी पालक-मूल हे नाते नवरा-मूल/बायको-मूल पेक्षा बळकट असायचे/असावे.

बायकोने बॅंक आणि बिलं सांभाळावी, 
नाहीतर ती अडाणी-
असले शेरे आता  “politically correct” नाहीत
हे कळायला हवंय तुला-

काय पॉलिटिकली करेक्ट नि इन्करेक्ट? अहो हे असे बोलणे आजकाल चुकीचेच आहे!

बायको लाडात असतांना टी.व्ही. जास्त महत्त्वाचा वाटत असेल,
जेवतांना एकीकडे इंटरनेट शिवाय चालत नसेल,

अरेरे! असे करणारा नवरा खरोखरच कमनशिबी म्हणायला हवा

असो. मी (कदाचित तुमच्याइतका)अनुभवी नाही, नवरा तर त्याहून नाही  पण कवितेतून प्रकटलेले एकांगी विचार खटकले, म्हणून प्रतिसाद टंकला.