मला वाटत भारताला आणखी एका फाळणीची/पुनर्रचनेची गरज आहे.
एकच कशाला? मी तर म्हणतो अगदी तुकडे तुकडे, शंभर शकले करून टाकावीत. शंभर फाळण्या कराव्यात. म्हणजे त्रासच नाही. महाराष्ट्रापासून सुरुवात करू या. मुंबई वेगळी, कोकण वेगळा. खानदेश वेगळा. विदर्भ वेगळा. विदर्भातही वऱ्हाड वेगळा. झाडीप्रदेश वेगळा. पश्चिम महाराष्ट्र वेगळा. मराठवाडा वेगळा. काही कटकटच नाही.
महाराष्ट्रातून भैय्यांना हाकलू या. उत्तरप्रदेशातील मराठी माणसांना. झाशी, बुंदेलखंड सगळीकडून. मुंबईत फक्त मराठी माणूस. मग तिथे मराठी माणसातलाही कोकणी शिल्लक ठेऊ या. बाकींची छुट्टी. मराठी पुण्यातून सगळ्या मराठी उपऱ्यांना हाकलू. म्हणजे भुसारी कॉलनी रिकामी. विदर्भातून सगळेच हद्दपार करू. फक्त माडिया, कोरकू वगैरे आदिवासी राहू द्या.
म्हणजे मज्जाच मज्जा येईल. त्यातही जातिनिहाय, पोटजातिनिहाय केल्यास उत्तम. म्हणजे अगदी कोकणस्थातल्या हिरण्यकेशींसाठी वेगळे राष्ट्र, आपस्तंभांसाठी वेगळे. तर अशी पुनर्रचना व्हायलाच हवी. मी तर म्हणतो हळूहळू अख्ख्या दुनियेचीच पुनर्रचना व्हायला हवी.