कसे तुझे फुलारणे कळे मला दुरूनही ?
तुझा सुगंध वाहते तरी झुळूक कोणती ?
वा..वा..
भरून पावतो कसा बघून फक्त मी तुला ?
प्रमत्त यौवनात ही विदेह भूक कोणती ?
अतिसुंदर शेर...अप्रतिम.
१) मतल्यात दोनदा घडेल आल्याने त्यातील गंमत गेली. संदिग्धता आली.
२) अनंगरंगमध्ये गझल हा शब्द उगीचच्या उगीच दावणीला बांधलात तुम्ही ! शिवाय यमकही निराळेच वापरलेत...
शुभेच्छा, पुढील गझलेसाठी.