आपल्या अनुभवांवरून आपल्याला किती मनस्ताप झाला असेल ते समजू शकलो.
या कंपनीच्या/परदेश प्रवास पुरवणाऱ्या इतर कंपन्यांच्या सर्वच सहलींमध्ये ही स्थिती असते का? आणि 'भारतीय जेवण' हा मुद्दा सहलीसाठी पैसे भरून नोंदणी करताना स्पष्ट केला जातो का? सहलींच्या माहितीपत्रकामध्ये चांदणी आणि खाली अगदी छोट्या अक्षरात 'कंडीशन्स अप्लाय' लिहिलेले असते का? यापुढे अशा सहलींसाठी नोंदणी करताना काय काय काळजी घ्यावी? काय काय प्रश्न तिथे आधीच विचारून घ्यावे? माहितीपत्रकातल्या आकर्षक मुद्द्यांमध्ये दडलेले छुपे त्रासदायक मुद्दे असे ओलखावे यावरही या लेखमालेच्या शेवटी तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.