महेशराव,
मला तुमचा ताजा प्रतिसाद आणि त्यासोबतची टीपही खरोखरच कळली नाही. 

तुमची टीप अशी आहे... हे मी आनंदकंद वृत्ताची माहिती घेण्यासाठी विचारत नसून त्याचे उत्तर तुम्ही ज्या पद्धतीने द्याल त्यावरून मला माझ्या पुढच्या म्हणण्याची मांडणी करता येईल आणि चर्चा भरकटणार नाही, ह्या उद्देशाने विचारत आहे.

माहिती देण्याची माझी पद्धती खरोखरीच इतकी दिशाहीन आहे काय, की ज्यामुळे तुम्हाला चर्चा भरकटल्यासाऱखी वाटावी ? आपली चर्चा तुम्हाला भरकटल्यासारखी वाटली...हे वाचून मला खूपच वाईट वाटले.

आनंदकंद वृत्ताबाबतचे उत्तर मी तुम्हाला आता कशा पद्धतीने द्यावे बरे ? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपला,
प्रदीप कुलकर्णी