उकरून काढला मी इतिहास आज थोडा
केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने
वा...वा...
डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो
नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने
सुंदर
चुकलेच आज माझे संवाद साधला मी
होईल वाद आता येथे नव्या दमाने
वा...वा...वा...
ठाऊक सर्व होते होणार काय आहे!
लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?
अतिसुंदर...
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने
जखमा चाळणे ही कल्पना काही आवडली नाही, अनिरुद्ध
गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा
गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने!
फारच छान .
शुभेच्छा, पुढील गझलेसाठी