म्हणजे एकावेळेस ५ भाषा शिकणे अपेक्षित आहे का? तसे असल्यास हा अतिरेक होईल.
आम्ही एका कंपनीच्या आवारातल्या अतिथिगृहात राहत असताना तिथल्या मुलांच्या निरीक्षणातून ही गोष्ट लक्षात आली. तिथल्या वसाहतीतील लहान मुले आपापसात मुंबई हिंदीत, बसपर्यंत सोडायला येणाऱ्या आजी आजोबांशी त्यांच्या दाक्षिणात्य भाषेत, कंपनीच्या बसच्या कंडक्टरशी मराठीत आणि शाळेत इंग्रजीत अगदी सफाईने बोलू शकत होती.