त्य्त्याअसकविता लिहितांना तिचं स्वरूप इतकं स्फोटक होईल अशी कल्पना नव्हती. तसेच, छायाताईंच्या वयाचीही कल्पना नव्हती. पण म्हणून मी त्यांचा अनादर केलाय असं मला वाटत नाही, उलट त्यांच्या सूचनेनुसार पुनर्विचारच केला आहे. शिवाय, मायाजालावर कोणाचे वय कळण्याचा काही निश्चित मार्ग ही नाही... असो. मला वाटतं त्यांनी हे मोठ्या मनाने समजून घेतलंच असणार.

सर्वत्रीकरणाबद्दल बोलायचं असेल, तर पुरूषांच्या दृष्टीने हे सर्वत्रीकरण त्यांच्या बरेचदा पथ्यावरच पडतं- उदा. पुरूषांना संवाद साधण्याची आवड नसते किंवा स्रियांयेवढी गरज भासत नाही, ह्या कारणानिमित्त नातेवाईकांना करायचे फोन, किंवा public relations च्या जबाबदारीतून सोईस्कर सुटका करून घेता येते. पुरूषांना "तंत्रज्ञानाबद्दल" अतिशय आकर्षण असतं, आणि टी.व्ही पुढे बसल्यावर सर्व जग मिथ्या आणि ते एक सत्य, असं वाटत असतं, हे ही अनेक स्त्रियांकडून ऐकायला मिळतं.

अर्थात, कुठल्याही सर्वत्रीकरणाला अपवाद असतात, त्यामुळे कवितेचे नाव, "समस्त नवऱ्यांना" असे नसून, "प्रिय नवऱ्यास" आहे, हे लक्षात घ्यावे. मात्र बघणाऱ्याच्या दृष्टीकोणानुसार समाजातल्या अनेक गोष्टी एकांगी (पुरूषप्रधान) वाटू शकतात. ईमेल फॉरवर्ड मधे स्त्रियांवर आधारित विनोद कितीतरी येत असतात, त्यात स्त्रियांचे सर्वत्रीकरणच होत असते ना! मजेची गोष्ट म्हणजे, बँकेची कामं करणार नाही, असं सांगतांना स्रिया ही त्यांच्या बद्दलच्या सर्वत्रीकरणाचा हळुच फायदा घेत असू शकतात