मराठीचे आदिकवींपैकी एक चक्रधर जन्माने मराठी नव्हते.(चुभु देणेघेणे)... महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे मूळचे गुजराथचे राजपुत्र. मूळचे नाव हरपाळदेव. जुगारामुळे कफल्लक होऊन त्यांनी घर सोडले. ११८५(?) मध्ये ऋद्धिपूर(जिल्हा बीड?) येथे गोविंदप्रभू(गुंडम राऊळ) यांचे शिष्यत्व पत्करले. दोन लग्ने केली, शेवटी वैराग्य येऊन संसार सोडून महाराष्ट्रात आले. १२६३(?) मध्ये दत्ताचे दर्शन झाले आणि त्यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. जन्म आणि बालपण सोडले तर उर्वरित आयुष्य महाराष्ट्रात गेले, त्यामुळे ते मराठीच. कर्नाटक, तेलंगण या प्रांतात न जाता "महाराष्ट्री वसावे" असा त्यांचा शिष्यांना उपदेश असे.