मी ज्या वसाहती राहत होतो तिथे तमिळ आई आणि बंगाली वडील यांचा आठ वर्षाचा मुलगा, हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि बंगाली उत्तम बोलायचा.  आजोबा संस्कृत पंडित, त्याला संस्कृत शिकवायचे.  शाळेत आठवीपासून फ़्रेन्च किंवा जर्मन शिकेलच.  दुसरी एक मुलगी नऊ वर्षाची. तंजावरची असल्याने तमिळ बोलायची.  मुंबईत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्याने, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. शिवाय मातृभाषा शिवकालीन मराठी, म्हणून घरी त्त्या भाषेत बोलावे लागे.  मोठी झाल्यावर अधिक भाषा शिकेलच.  कन्याकुमारीचे दुकानदार एकापेक्षा अधिक भाषा लीलया बोलतात. निदान पाच-सहा तरी. योग्य वयात पाच-सहा भाषा शिकणे अजिबात अवघड नाही. अधिक भाषा येत नाहीत ते यूपी-बिहार-बंगाल आणि महाराष्ट्रातील लोकांना. मराठी लोकांना धड  मराठी शुद्ध येत नाही, हिंदी-इंग्रजी तर विचारूच नका. आज दूरदर्शनवर एकतरी मराठी निवेदक हिंदी-इंग्रजी बोलताना दिसतो का?